मनसे : राज ठाकरेंना भीमसेन महाराजांची प्रतिमा भेट
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चिपळूण सभेला जाताना त्यांनी उंब्रज येथे कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांचा ताफा उंब्रजला दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज ठाकरे यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी भीमसेन महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली.
रत्नागिरी येथे आज राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरीकडे जाताना उंब्रज (ता. कराड) येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. चिपळूणकडे जाताना राज ठाकरे यांचे उंब्रज व पाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्याच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार व धैर्यशील पाटील, जिल्हासचिव राजू केंजळे, कराड उत्तर तालुका अध्यक्ष रणजित कदम, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, उपजिल्हाध्यक्ष अमोल कांबळे, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी व चंद्रकांत कदम, वहातुक सेना उपजिल्हा संघटक सतीश यादव,रोजगार विभागाचे जिल्ह्या संघटक,नियीन महाडीक, पदाधिकारी, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.