क्राइमताज्या बातम्यादेशनोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसाताराहवामान

सातारा जिल्ह्यावर शोककळा : लेहमध्ये नायब सुभेदार शंकर उकलीकर यांना वीरमरण

कराड | भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय- 38) हे जवान शहिद झाले आहेत. लेह येथे सोमवारी दि. 9 रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी उद्या येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शंकर उकलीकर यांचे शिक्षण वसंतगड येथे जिल्हा परिषद आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत शंकर उकलीकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सन 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी 22 वर्ष सेवा बजावली होती. त्याच्या पश्चात आई, भाऊ- भावजय, पत्नी, आर्या ही 6 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. वसंतगड येथील डोंगराच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार करण्याची पूर्वतयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

गेल्या 6 महिन्यापूर्वी गावकऱ्यांशी शेवटची भेट
शंकर उकलीकर हे गावी वसंतगडला दरवर्षी गणपतीला येत असत. परंतु, चालूवर्षी त्यांना कामामुळे येता आले नाही. लेह येथे बर्फाळ प्रदेशात ड्युटीला असल्याने त्यांना सुट्टी मिळाली नाही. तसेच गेल्या 6 महिन्यापूर्वी ते वसंतगड येथे आपल्या गावी सुट्टीला आले होते. तेव्हा कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी शेवटची भेट ठरली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker