साताऱ्यात NCP प्रबळ होती, आता नाही आता केवळ भाजपा : आ. जयकुमार गोरे
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झालं असुन भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होतं सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुतीमध्ये मतदारसंघावरुन नवा पेच निर्माण झालाय. सातारा लोकसभा मतदार संघावर शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी दावा केल्यानंतर कर्जतला शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महायुतीमधून लढेल असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि आज माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही सातारा मतदार संघावर दावा केला आहे. पूर्वी राष्ट्रवादी साताऱ्यात प्रबळ होती, आता नाही आता केवळ भाजपा लोकसभेला एकमेव पर्याय असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
भाजपानं गेल्या चार वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केलय तसंच भाजपा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष सुद्धा भाजपाच आहे. यामुळं कोणी काहीही भुमिका मांडत असेल तरी हा मतदासंघ कोणत्याही किमीतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे, अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे मांडली असल्याचे आ. जयुकमार गोरे यांनी म्हटले आहे. आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगुन थेट अजित पवारांनाच थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळतय. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, अजित दादांनी व्यक्तिगत भूमिका मांडली असून सातारा जिल्ह्यात भाजपाने प्रचंड ताकदीने काम केले आहे. तेव्हा कोण काय भूमिका मांडत आहे, याबाबत वरिष्ठ चर्चा करतील. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता, सातारा लोकसभा मतदार संघात भाजपाचा खासदार होण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आम्ही सातारा लोकसभा मतदार संघ सोडणार नाही. यापूर्वी राष्ट्रवादी प्रबळ होती, आता कोठेही प्रबळ नाही. सातारा मतदार संघात भाजपा सोडून बाकींच्या पक्षांना फार कमी स्कोप आहे, कोरेगाव मतदार संघात वेगळी परिस्थिती नाही. कराड उत्तरमध्ये आम्ही ताकदीने लढतोय, तिथे कुठेही प्राॅब्लेम नाही. कराड दक्षिणमध्ये वन टू वन फाईट असून पाटणला बघतायचं. तेव्हा 100 भाजपाच लढणार आहे. आज खूप गोष्टी बदलल्या असून एकमेव भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय लोकसभेला आहे.