कोयनेत पाण्याची आवक कमी : अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला कोयनेत 9 हजार 860 क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात अवघे 0.67 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 82.16 टीएमसी पाणीसाठा आहे. अलमट्टी धरण 98 टक्के भरल्याने असून धरणातून 70 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
कोयनेत 82. 16 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 82.16 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 12 मिलीमीटर, नवजा- 13 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 10 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 3112, नवजा- 4420 आणि महाबळेश्वरला- 4077 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वांग धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे वांग मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाची वक्र द्वारे खुली असल्याने धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग पुढील काही तासात सुरु होऊ शकतो. वांग नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये.