सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट : कोयनेत प्रतिसेंकद 76 हजार क्युसेस पाण्याची आवक

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या 24 तासात 6. 46 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाटण तालुका प्रशानाने रात्रभर जागे राहून आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. गेल्या 24 तासाता धरणात प्रतिसेंकद 75 हजार 762 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 37.56 टक्के धरणात पाणीसाठा साठलेला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात पावसाची अजूनही जोरदार हजेरी लावलेली आहे. पाटण तालुका प्रातांधिकारी सुनिल गाढे यांनी अपत्कालीन पथकासोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोयना विभागातील चाफेर येथील साकव पूल वाहून गेल्याने रात्री 11 वाजता स्थानिकांशी प्रांताधिकारी यांनी संवाद साधला. तसेच काडोली गावाचाही साकव पूलाची पाहणी केली.
कोयनेत 37. 56 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात मंगळवार व बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 37. 56 टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात 31. 10 टीएमसी साठा होता. कोयनेला- 253 मिलीमीटर, नवजा- 274 मिलीमीटर व महाबळेश्वर- 334 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 1560, नवजा- 2238 आणि महाबळेश्वरला- 2232 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.