विद्यमान आमदारांना जनता कायमचीच रस्त्यावर बसवणार : मनोजदादा घोरपडे
कराड | विद्यमान आमदारानी पंचवीस वर्षे सत्ता भोगून आणि अडीच वर्ष मंत्रिपद भोगून सुद्धा त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली असून कराड उत्तर मध्ये परिवर्तनाची योग्य वेळ आहे. कराड उत्तरची जनता यांना कायमच रस्त्यावर बसवल्या शिवाय राहणार नाही. मसूर येथे यांनी केलेलं आंदोलन म्हणजे केवळ दिखावा असून येणाऱ्या 22 तारखेला पाणी सोडले जाणार होते. तसे नियोजन झाले होते, परंतु केवळ प्रसिद्धीसाठी एक स्टंट म्हणून आंदोलन केले असून जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. जनाता आता यांच्या नौटंकीला कंटाळली असून संपूर्ण मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. या लाटेमध्ये विद्यमान आमदारांना कायमचच रस्त्यावर बसावं लागणार आहे, असा टोला भाजपा नेते व कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी लगावला.
नलवडेवाडी (ता. कोरेगाव) येथे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या प्रयत्नातून 18 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सभापती भीमरावकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, संपतराव माने, सरपंच महादेवराव नलावडे, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, संचालक विक्रमबाबा कदम, विकास सोसायटीचे चेअरमन राजू नलवडे, प्रल्हाद जाधव, जगन्नाथ नलवडे, बाबुराव नलवडे महेश उबाळे, महीपती यादव, दिनकर नलवडे, गुलाब वाघ, प्रशांत निकम, सुरज चव्हाण, वाठार किरोलीचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..
भीमराव पाटील यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ही योग्य वेळ आहे कराड उत्तर मध्ये एकास एक उमेदवार देऊन आमदारांना कायमच घरी बसवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
वासुदेव माने म्हणाले, मला काही या ठिकाणी कोणतीही निवडणूक लढायची नसून येणाऱ्या विधानसभेला कराड उत्तर मध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लागेल, तेव्हा वाटेल तेवढे प्रयत्न करून विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडून दिला जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास निधी आणून विकासकामांचा बॅकलॉग भरून काढणार असून या बिन कामाच्या आमदारांना घरी बसवण्यास सर्वांनी कामाला लागावे. यावेळी प्रास्ताविक प्रल्हाद जाधव यांनी केले. आभार अण्णा धुमाळ यांनी मानले.