मलकापूरात 202 लाभार्थ्यांना 2.42 कोटीचे अनुदान वाटप

मलकापूर :- मलकापूर नगरपरिषदेने प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गत २०२ पाञ लाभार्थ्यांना दि.२७/०२/२०२५ अखेर २.४२ कोटी निधीचे वाटप केले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी दिली.
मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेञामधील नागरिकांना वेळेत घराचे बांधकाम पूर्ण करुन निधिचा लाभ मिळणेकामी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने मलकापूर नगरपरिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे. या बाबत कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
प्रधानमंञी योजनेअंतर्गत उपलब्ध होणारा निधी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहे तरी नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडे संपर्क साधावा.
प्रताप कोळी
मुख्याधिकारी मलकापूर नगरपरिषद