शामगावचे पाणी पेटले : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून शेतकऱ्यांनी दिला अमरण उपोषणाचा इशारा

कोपर्डे हवेली | शामगाव (ता. कराड) येथील शेतकरी ग्रामस्थांनी 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेतीसाठी पाणी निश्चिती केली नाही. तर एक नोव्हेंबर 2023 पासून अमरण उपोषणाचा इशारा निवेदाना द्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिला असून जलसंपदा तसेच विविध विभांना पत्राद्वारे कळविले आहे. यावेळी सरपंच विजय पाटोळे,माजी पंचायत समितीचे सदस्य भिमराव डांगे,रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील, युवराज पोळ,बंडा पोळ शंकर पोळ आदि उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, शामगावची जमीन पाणी सिंचनाखाली येण्यासाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून शाळगाव बोंबाळवाडी तलावातून पाणी निश्चिती करुन सर्वैक्षण करुन शामगाव पाणी सिंचन योजना मंजूर करावी. आमचे गाव जिरायती असून शेती पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आम्हाला उदरनिर्वाह करणे अशक्य आहे. कृष्णा नदी आणि टेंभू प्रकल्प हे अंतर केवळ 30 किलोमीटर आहे. तर टेंभू योजनेतून शाळगाव बोंबाळवाडी तलावाचे अंतर केवळ 3 किलोमीटर आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेतीच्या पाण्याचा प्रश्न पाणी निश्चिती करुन सर्वैक्षण करुन उपसा सिंचन योजना मंजूरीचा शासन निर्णय आदेश न मिळाल्यास आम्ही शामगाव ग्रामस्थ 1 नोव्हेंबर 2023 पासून शामगाव येथे अमरण उपोषण करणार आहे. यांची नोंद घ्यावी असे म्हटले आहे. निवेदनच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा विभाग, कराड तहसील, प्रांत तसेच लोकप्रतिनिधी यांना देण्यात आल्या आहेत.