कापीलच्या मैदानात आभाईदेवी प्रसन्न बैलगाडीने पटकावली मानाची ढाल

कराड | कराड तालुक्यातील कापील येथील श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त गुरुवारी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी सुमारे 60 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या शर्यतीच्या अंतिम फेरीत अभईचीवाडी येथील आभाईदेवी प्रसन्न या बैलगाडीने रोख 25 हजार व मानाची ढाल हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
कापील येथील आराध्या देशमुख यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कापिलच्याच ज्योतिर्लिंग प्रसन्न सुंदर प्रेमी या बैलगाडीने मिळवले. चतुर्थ क्रमांक येरवळे येथील बापूराव यादव यांच्या कै.शिवा ग्रुप या गाडिला, पाचवा क्रमांक काले येथील दिलीप पाटील यांच्या गाडीने तर सहावा क्रमांक नांदगावच्या विश्वजीत पाटील यांच्या गाडीने मिळवला.
या बैलगाडी शर्यती यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ. कल्पना गायकवाड, उपसरपंच सुषमा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य धोंडीराम मोरे, गोकाक पाणीपुरवठा संचालक सागर पाटील, कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे पाटील, युवा उद्योजक अक्षय देशमुख, इंद्रजीत देशमुख, यामिनी उद्योग समूहाचे राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, हर्ष पाटील, राहुल सावंत, सुरज मोरे, बजरंग डांईगड़े, राजेंद्र देशमुख, आनंदा जाधव, रवींद्र सावंत, हनुमंतराव दिग्विजय पाटील, जय सावंत, संजय सावंत, विक्रम सावंत, अमित सावंत, डॉ. हणमंत सावंत, दिग्विजय जाधव यांच्यासह कापील ग्रामस्थ व यात्रा कमीटी यांचे सहकार्य लाभले.