kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

रविवारी पाटणला अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा

पाटण | पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे (तळमावले) येथे रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Manojdada Ghaorpade

या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, या मेळाव्याला खा. श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्य. सह. बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, आ. दिपक चव्हाण, दिपक पवार, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव- ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, सर्व आजी- माजी जि. प. व पं. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close