नवाब मलिकांना जामीन देण्यामागे राजकारण : आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संशय
कराड | नवाब मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर नवाब मालिकांवर राजकीय दबाव आणून भूमिका घ्यायला भाग पाडले असावे, असा संशयही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर सीबीआय यंत्रणांनी आता जामीनला विरोध का केला नसल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय संविधानातील कलमे बदली यावरही हल्लाबोल केला असून काॅंग्रेस फोडण्याचे शहा- मोदीकडून सुरू असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकार मनुस्मृती लागू करणार काय
भारतीय दंड संहिता,भारतीय साक्ष संहिता यासारख्या कायद्यात बदल करून मोदी सरकार मनुस्मृती लागू करणार की काय असे भीती आता वाटत आहे. परंतु हे जरी केले तरी निरपेक्षपणे निवडणुका घेतल्या तर मोदी सरकार पुन्हा काही सत्तेत येणार नाही.
आमदार राजेश राठोड यांच्यावरील हल्ल्यावर कारवाई करावी
जालन्याचे काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राजेश राठोड यांनी आदिवासी यांच्या प्रमाणपत्राचा मुद्दा विधानसभेत चांगलाच उचलून धरला होता. आदिवासींची खोटी प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी याचा लाभ घेतला होता अशा लोकांकडून राजेश राठोड यांना वारंवार धमक्या सुद्धा येत होत्या तरीसुद्धा राजेश राठोड यांनी आपला मुद्दा आक्रमकपणे मांडला होता यावर चिडून जाऊन बोगस प्रमाणपत्र लाभार्थी यांनी हा हल्ला केला आहे त्यामुळे राजेश राठोड यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न शहा मोदी यांच्याकडून नेहमीच सुरू असतात
काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न शहा मोदी यांच्याकडून नेहमीच सुरू असतात. देशभर ते हे प्रयोग करत असतात एकंदर काँग्रेसमुक्त भारत असे जे भाजपचे स्वप्न आहे. ते कधीही पूर्ण होणार नाही. आणि काँग्रेसचा कोणताही मोठा नेता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण 2024 ला भाजप सत्तेत येईल अशी खात्री कोणालाच नाही. अशी प्रतिक्रिया आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अफवांवर दिली.