आ. पृथ्वीराज चव्हाण आॅन फायर : मोदी, भाजप, सावकरकर, कर्नाटक निवडणूक मुद्यावरून हल्लाबोल
कराड | विशाल वामनराव पाटील
काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी, भाजप, कायदा सुव्यवस्था आणि सावरकर या मुद्यावरून भाजपाला काही प्रश्न विचारत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त केलेल्या भाषणात काॅंग्रेस आणि गांधी कुटुंबियावर हल्ला केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावरून कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाला यशाची खात्री नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, काॅंग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न टाळण्यासाठी मोदी काॅंग्रेसवर हल्ला करत असून तो अपेक्षित आहे. भारताच्या पंतप्रधानाची डिग्रीची माहिती विचारली असता ती लपवत का आहेत? असा सवालही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
देशात 80 करोड लोकांना मोफत धान्य दिलं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले त्यावर देशात 80 करोड लोकांना धान्य द्यावे लागतंय, ही भूषणावह गोष्ट आहे का असा सवाल विचारला आहे. एवढ्या लोकांना मोफत धान्य द्यायला लागणं हे सरकारचे अपयश आहे. यूपीए सरकारने 22 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर काढले होते, ते पुन्हा दारिद्र्यरेषेखाली गेले.
सावरकरांच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आवाहन
भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा सावकरकरांचा इतिहास वाचावा. सावरकरांच्या मुद्यावर खुली चर्चा होण्याची आवश्यकता आहे. भाजपाकडे स्वातंत्र्य युध्दात भाग घेतलेला एकही व्यक्ती नाही. सावरकर अंदमानातून कसे सुटले यावर बोलावे. काॅंग्रेसने विचारलेले प्रश्न टाळण्यासाठी सावरकर गाैरव यात्रा काढली जात आहे.
मोदी हा समाज नाही ः पृथ्वीराज चव्हाण
देशातील बॅंकांना लुटून गेलेले जे लोक भगाैवडे आहेत, त्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मोदी हा समाज नाही. मोदी आडनाव हे मुस्लिम, पारशी, बनिया, मारवाडी समाजात आहे. त्यामुळे मोदीचा अवमान म्हणून राहूल गांधीना शिक्षा हा जावईशोध असल्याचा खोचक टोला सरकारला लगावला आहे.
आशिष देशमुखांनी काॅंग्रेस सोडायचा निर्णय घेतला असेल?
काॅंग्रेसचे माजी आ. आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिस्तपालन समितीने कारणं दाखवा नोटीस दाखवली आहे. यावर आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आशिष देशमुखांनी केलेली वक्तव्ये आश्चर्यचकित करणारी आहेत, काॅंग्रेस पक्ष सोडायचा निर्णय घेतला असले तर मला माहिती नाही. परंतु त्याच्या घराण्याला काॅंग्रेसची एक परंपरा आहे.
गिरीश महाजनांना पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला
गिरीश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना एखाद्या ठिकाणाहून खासदार होऊन दाखवावे असं आव्हान दिलं होतं. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाजनांनी माझा राजकीय बायोडाटा एकदा उघडून बघावा. मी कितीवेळा खासदार, आमदार राहिलो आहे, त्याचा अभ्यास करावा.