खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा
कराडला राष्ट्रीय खेळाडू देणारे प्रा. लक्ष्मण दोडमणी PH.D पदवीने सन्मानित
कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
तळमावले (ता. पाटण) येथील प्रा. लक्ष्मण भीमसेन दोडमणी यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी पदवी देऊन सन्मानित केले. गेली 20 वर्ष श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये 200 पेक्षा अधिक राज्यस्तरीय खेळाडू तर 10 राष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रा. दोडमणी यांनी “योग प्रशिक्षणाचा बारा ते सोळा वर्षे वयोगटाच्या बालगृहातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक परिपक्वतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास” या विषयावर संशोधन करून सदरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला होता. त्यास मान्यता देऊन विद्यापीठाने त्यांना पीएच.डी पदवीने सन्मानित केले.
डॉ. देवेंद्र बिरनाळे यांनी त्यांना पीएच. डी साठी मार्गदर्शन केले. सातारा जिल्ह्यात सॉफ्टबॉल हा खेळ रुजविण्यात प्रा. दोडमणी यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव असताना, त्यांनी सॉफ्टबॉल खेळाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले होते. जिल्हा क्रिडा परिघामधे सॉफ्टबॉल या खेळाचे उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सध्या ते विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी- काळभोर या शाखेत शारिरीक शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहेत.
या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) सिताराम गवळी, तसेच संस्था सीईओ कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर, प्राचार्य एस. के. कुंभार, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, डॉ. बी. एन. उलपे, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. मच्छिंद्र कदम -पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.