कोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसांगलीसातारासामाजिकहवामान

“रन फॉर युनिटीत” गणेश भोसले, स्वप्नाली खांडेकर प्रथम

कराड तालुका पोलीस ठाण्याकडून आयोजन

कराड :- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कराड तालुका पोलीस ठाण्याकडून रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या गणेश भोसले तर महिलांच्यात स्वप्नाली खांडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यासोबत विद्यार्थी गटात ओमकार नलवडे तर विद्यार्थींनी गटात श्रेया शिंदे हिने पहिला क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत तालुक्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रन फॉर युनिटी मध्ये तीन किलोमीटर अंतर रनिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विजेत्यांना ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कराड तालुका पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे…
पुरुष गट :- 1. गणेश धोंडीराम भोसले राहणार मुनावळे ता कराड, 2. सौरव सतपाल जाधव राहणार विंग, 3. मनोज निवास पाटील राहणार विंग, 4. रविराज कृष्णत कदम राहणार विंग, 5. आयुष अनिल घोरपडे जयवंतराव भोसले एग्री कॉलेज रेठरे

महिला गट:- 1. स्वप्नाली नाना खांडेकर जयवंतराव भोसले एग्री कॉलेज रेठरे, 2. प्रियंका अंकुश दडस (पोलिस), 3. अंकिता एकनाथ माने जयवंतराव भोसले एग्री कॉलेज रेठरे

विद्यार्थी गट :-1. ओंकार सुरेश नलवडे, 2. तन्मय संतोष थोरात

विद्यार्थिनी गट:- 1. श्रेया रमेश शिंदे, 2. प्रांजली स्वप्निल तोडकर, 3. वैष्णवी सचिन कदम

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close