सातारा जिल्ह्यात ‘या’ दोन तालुक्यात होणार पोलीस पाटलांची भरती

सातारा | सातारा व जावली तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदभरती सरळसेवा – 2023 बाबत जाहिर सोडतीद्वारे आरक्षण निश्चित झालेल्या गावांसाठीचा जाहिरनामा दि. 24 एप्रिल 2023 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा / वाई, तहसिल कार्यालय सातारा / जावली, पोलीस निरीक्षक, सातारा शहर/ तालुका/शाहुपूरी पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक बोरगांव / मेढा (जावली), गटविकास अधिकारी सातारा / जावली आणि संबंधीत गावचे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर तसेच तलाठी चावडीवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय, सातारा (निवडणूक शाखा-संगणक शाखा) येथून उपलब्ध करुन घ्यावेत. उमेदवारांनी परिपूर्ण भरलेले अर्ज दि. 25 एप्रिल 2023 ते दि. 4 मे 2023 अखेर सुट्टीचे दिवस सोडून) सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत पुराव्यांचे कागदपत्रे जोडून समक्ष दाखल करावेत.
पोष्टाद्वारे, ईमेलद्वारे अथवा इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांनी कळविले आहे.