सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट : NDRF ची टीम कराडला दाखल
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्याला आज रेड, उद्या ऑरेंज तर पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 3 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 64. 32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजता धरणातून 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कराड व पाटण तालुक्यातील संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरफची टीम सर्व साधन- सामुग्रीसह दाखल झालेली आहे.
कोयनेत 64. 32 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 64. 32 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 119 मिलीमीटर, नवजा- 189 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 154 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2459, नवजा- 3463 आणि महाबळेश्वरला- 3257 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 36 हजार 007 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
कोयना धरण ते कराड पर्यंतच्या नदीची सद्य स्थितीतील पाणी पातळी आणि धोका पातळी जाणून घ्या
1) कोयना जुना पूल – कराड – पाणी पातळी – ५५५.९४३(१९ʼ६”), (इशारा -४५ʼ), (धोका-५८ʼ४ʼʼ)
2) वारुंजी – पाणी पातळी – ५५५.१३७ (१८’८”) विसर्ग १४४६५ क्युसेक, (इशारा-४३ʼ१०”), (धोका – ५१ʼ८”)
3 ) हेळवाक पुल- पाणी पातळी ५७४.४० मी., (इशारा ५७६.८० मी.), (धाेका ५७८.६० मी)
4) केरा पुल पाटण-ृ ५६७.५० मी., (ईशारा ५७०.४५ मी.), (धाेका ५७२.९७ मी.)