Hello News 2026 Ganpati Arati Book
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसाताराहवामान

सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या ‘ऑरेंज’, तर रविवारी ‘रेड अलर्ट’

कोयनानगर – कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात 7 हजार 585 क्युसेस पाण्याची आवक धरणात झाली आहे. कोयना धरणात सध्या 16.3 टीएमसी पाण्याचा साठा आहे.

गेल्या 24 तासात कोयनेत 53 मिलीमीटर, नवजाला 105 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 158 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज आणि उद्या आॅरेज अलर्ट दिला आहे. तर रविवारी रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. तर पश्चिमेकडे पाऊस पडत असल्याने पाटण, कराड, वाई, सातारा, जावली, महाबळेश्वर या तालुक्यातील अनेक भागात पेरणीला वेग आला असल्याने शेतकरी शेतात राबताना पहायला मिळू लागले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close