नात्याला काळीमा : सावत्र आईने अल्पवयीन मुलीस देहविक्रीस भाग पाडले
सातारा | शहरातील एका लाॅजवर सावत्र आईने मुलीला बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने देहविक्री करण्यास लावले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एका महिलेसह अनोळखी अंदाजे 40 वर्षीय पुरुषावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरात एक महिला, मुलगी व इतर कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. त्या महिलेस सावत्र आईने मुलीला बाहेरचे लोक आले आहेत, त्यांच्यासोबत फिरायला जात असून, सोबत तुझ्या मुलीला नेते, असे सांगितले. तेव्हा त्या महिलेने 14 वर्षे वयाच्या मुलीस तिच्यासोबत पाठवले. यानंतर त्या मुलीस सातारा येथील एका लॉजमध्ये नेले. याठिकाणी असणाऱ्या अंदाजे 40 वर्षीय पुरुषाकडून 3 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर सावत्र आईने मुलीस त्या पुरुषाच्या ताब्यात दिले.
मुलीस ताब्यात घेतल्यानंतर त्या पुरुषाने मुलीवर लॉजमधील खोलीत अत्याचार केले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पीडितेच्या वतीने फिर्याद नोंदविण्यात आली आहे. यानुसार भारती कट्टीमनीसह अनोळखी पुरुषावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक वाघमोडे हे करोत आहेत.