रोखठोक आ. बाळासाहेब पाटील : मंत्रीमंडळ विस्तार, सदाभाऊ खोत आणि केंद्रीय यंत्रणेविषयी म्हणाले…
कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पार्टी असे महत्वाचे स्तंभ असतात. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते. विरोधी मंडळीनी जल आंदोलन, रस्त्यावर येणे आणि पदयात्रा करणं क्रमप्राप्त असतं. सदाभाऊ खोत हे सरकारमध्ये आमदार, मंत्री 6 वर्ष होते आणि आजही सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे प्रश्न मांडला पाहिजे, असा सल्ला माजी सहकारमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
कराड ते सातारा अशी वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने काढलेली आहे. या यात्रेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा माजी सहकारमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी समाचार घेतला. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर, मंत्रिमंडळ विस्तार आणि शरद पवार यांच्यावरील टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
केंद्र व राज्य केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकीयदृष्ट्या केला जात आहे. ज्याच्यावर पूर्वी आरोप झाले ते आता भाजपमध्ये गेले, शिंदे गटात गेले त्यांची चाैकशी होत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम सुरू सरकारकडून सुरू आहे. भाजपाचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत हे लोकप्रियता मिळावी, यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
मंत्रिपदासाठी अनेकजण शिंदे गटात गेलेले ः- आ. बाळासाहेब पाटील
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या आमदारांना अपेक्षा आहे. शिवसेनेतून शिंदे गटात मंत्रिपदसाठी अनेकजण गेलेले आहेत. विस्तार होण्यापूर्वी मला मंत्रीपद मिळणार, पालकमंत्रीपद मिळणार असे यापूर्वी कोणताही आमदार म्हणत नव्हता. त्यामुळे जे आमदार नाहीत, त्यांना मंत्रिपद मिळण्याबाबत साशंकता आहे, असे सदाभाऊ खोत यांच्याबाबत आ. पाटील म्हणाले.