ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तलाठी लाखेचा अजब सल्ला : वादळी वाऱ्यानंतर पंचनाम्यासाठी फोटो पाठविण्याचे फर्मान

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
शहापूर (ता. कराड) गावला मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. शहापूरला गावातल्या काही घरासह गावचाच भाग असलेल्या सह्याद्री कारखानाच्या पेट्रोल पंपासमोरील दहा- बारा ग्रामस्थांची घरे उध्वस्त झाली. मोठे नुकसान झाले आहे. लहान- मोठी झाडेही तुफानी वाऱ्याच्या दणक्याने उन्मळून पडली. अशा या आस्मानी संकटाचा सामना नागरिक करित असताना तलाठी रमेश लाखे या तलाठ्याने पंचनाम्यासाठी फोटो घेवून या असा अजब सल्ला ग्रामस्थांना दिला. या सल्ल्याने नागरिकांच्यात संताप दिसून आला तर स्वतः माजी सहकारमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दखल घेत आज शहापूरला भेट दिली.

शहापूर येथील श्रीकांत चव्हाण, अण्णा पवार रामचंद्र पवार, शिवाजी जाधव, वसंत पवार, महादेव गायकवाड, सिताराम जाधव, बाळासो गायकवाड, एकनाथ जाधव, तुकाराम पवार, सतीश पवार, अरुण डुबल, शामराव भोसले, राजेंद्र जाधव, मधुकर जाधव व सह्याद्री कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोरील विश्वनाथ शेलार, संतोष शेलार, तानाजी नाईगडे, गोरख शेलार, मारुती शेलार, लक्ष्मी पवार, कृष्णत शेलार, मुगुटराव शेलार, राजेंद्र शेलार यांच्या घराचे व जनावरांच्या गोठ्याचे व शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे.

या वादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरावरचे संपूर्णता छप्पर, पत्रे, गुरांच्या गोठ्यावरची पत्रे उडून गेली. सिमेंटचे खांब उन्मळून पडले. काहीचे शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे ग्रामस्थांना मोठा आर्थिक दणका बसला आहे. या वादळामुळे नुकसान व त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना रमेश लाखे या तलाठ्याने अनाहूत सल्ला देत हुकमी मनाचा कायदा दर्शवून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी नुकसानीचे फोटो घेऊन कार्यालयात या, मगच नुकसानीचा पंचनामा करतो. या तलाठ्याच्या मनमानीच्या स्वः घोषित कायद्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या तलाठ्याबाबतची तक्रारही तहसीलदारांच्याकडे करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आज तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी मर्ढेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close