ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उंब्रज येथे मोठा प्रतिसाद

कराड | स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आज मंगळवारी सायंकाळी उंब्रज (ता. कराड) येथे काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून या गौरव रथ मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. सावरकर प्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. यात्रेत मी सावरकर असे लिहिलेले बॅनर घेवून घोषणाबाजी करण्यात आली.
उंब्रज येथे गौरव यात्रेस भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कराड उत्तरचे युवानेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, महेशकुमार जाधव तसेच मान्यवर उपस्थित होते. या यात्रेत महिला तसेच सावरकर प्रेमींनी सहभाग नोंदवला.
यात्रेत भारत माता कि जय, वंदे मातरम्, छ. शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. यात्रेतील सहभागींनी डोक्यात भगवी टोपी घालत उंब्रजमधून रॅली काढली.