क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

Honey Trap : तरूणीने रूमवर भेटायला बोलावलं अन् व्हिडिओ करून लुटले

सातारा। हनी ट्रॅप करून दोन लाख रूपयांची मागणी करून एका तरुणाकडून 50 हजार रूपयांची खंडणी वसूल करणाऱ्या दोन महिलांसह सात जणांच्या विरूध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील पाचबत्ती चौक फलटण (ता. फलटण जि. सातारा) येथे साक्षी उर्फ मोनिका किसन मोहिते (रा. पाचबत्ती चौक फलटण, मूळ रा. शिंदेवाडी, तालुका- फलटण, जि. सातारा) हिने फिर्यादी तरुणास मला तुला भेटायचं व पाहायचे आहे, असे म्हणून भाड्याचे रूमवर बोलून घेऊन त्या ठिकाणी तिच्या इतर सहा साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी तू कुठला आहेस, आमच्या बहिणी जवळ काय करतोस असे म्हणून मारहाण करून संशयीत ऋषीकेश प्रल्हाद बोडरे (वय- 23 वर्षे, रा. खुंटे ता. फलटण, जि सातारा) याने फिर्यादी तरुण यांच्याकडील जबरदस्तीने मोबाईल काढून घेऊन जबरदस्तीने गाडीमध्ये बसविले. तेथून जुने आयटीआय कॉलेजचे जुन्या इमारती जवळ फलटण या ठिकाणी नेऊन दमदाटी करून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तुझ्यावर साक्षीला सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून फिर्यादी तरुणास धमकावून व्हिडिओ काढला. तसेच यातील महिला आरोपीने पोलीस असल्याचे सांगून पोलिसांना लाच देतो असे म्हणून आणखी एक गुन्हा दाखल करून घेते, असे म्हणून धमकावून हाताने मारहाण केली आहे. फिर्यादी तरुणास त्यांनी पैशाची मागणी केली. तसेच 50 हजार रुपये एटीएम मधून परस्पर काढून घेतले.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ऋषीकेश प्रल्हाद बोडरे, धिरज अमोल लगाडे (वय- 19 वर्षे रा. खुंटे ता. फलटण), प्रतिक विजय भंडलकर (वय- 19 वर्षे रा. खुंटे ता. फलटण), सौ. मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहिते (वय- 23 वर्षे, मुळ रा. शिंदेवाडी ता.फलटण, हल्ली रा. पाचचती चौक, फलटण), सौ. सुहासिनी योगेश अहिवळे (वय- 29 वर्षे, मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण, हल्ली रा. बिरदेव नगर, जाधववाडी ता. फलटण) या पाच जणांना तसेच या गुन्ह्यात सामील असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker