Satara News : फिरायला गेलेली 23 वर्षीय युवती नदीत बुडाली
सातारा | सातारा जिल्ह्यात फिरण्यासाठी गेलेली युवती निरा नदीपात्रात बदलण्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ वडाली आहे. कालपासून या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू असून अद्याप तिचा शोध लागला नसल्याचे शोध कार्य करत असलेल्या रेस्क्यू टीमने सांगितले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत नीरा नदीपात्राकडे युवती फिरण्यासाठी गेलेली. तेजल साळूंखे (वय- 23, रा. वरुड, ता. खटाव) बुडालेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स यांना पाचारण करण्यात आले आहे.
या टीमच्या सदस्यांच्या सहकार्याने नीरा नदी पात्रात शिरवळ पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत युवती न सापडल्याने आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या नीरा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे शोध घेणाऱ्या रेस्क्यू टीमला अडथळे निर्माण होत आहेत.