परशुराम महामंडळाचा ब्राह्मण समाजाला निश्चित फायदा होईल :- आशिष दामले

कराड :- काही लोकांनी ब्राह्मण समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. अशांना महामंडळाचे अध्यक्षपद न मिळाल्याने वाईट वाटले असेल. तरी त्यांची नाराजी दूर करू तसेच ब्राह्मण समाज एकसंघ आहे. या महामंडळाच्या उभारणीचा राज्यातील ब्राह्मण समाजातील दरी कमी करण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी व्यक्त केला.
परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी नुकतेच महायुती सरकारने स्थापन केले. या महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त कराड येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश उपाध्यक्षा सोनल ताई भोसेकर, मुकुंद उर्फ शार्दुल चरेगावकर, सुरेन्द्र काळे, संजय भोसेकर, घनश्याम उर्फ श्री पेंढारकर, ओंकार आपटे, प्रशांत कुलकर्णी, अँड. मिलिंद कुलकर्णी, शशांक शेंडे, अमित बुधकर, मनोज आचार्य, नितीन शाळीग्राम, प्रशांत कुलकर्णी रमेश कुलकर्णी, पी. डी. कुलकर्णी, गौरीताई निलाखे, विनिता पेंढारकर, शरयु माटे सुषमा काळे , अनघा कुलकर्णी, विशाखा कित्तूर आदी उपस्थित होत्या.
आशिष दामले म्हणाले, परशुराम महामंडळाकडून आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. या महामंडळाच्या उभारणीचा राज्यातील ब्राह्मण समाजाला निश्चितच फायदा होईल. या निर्णयामुळे आमच्या समाजात आनंदी वातावरण असून ब्राह्मणसह इतर समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.