Satara News : पुण्याहून साताऱ्यात येणारा 13 लाखांचा गुटखा, RMD वाहनांसह जप्त
सातारा | पोलिसांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम सुझुकी सुपर कॅरी वाहनातून पुण्याहून साताऱ्याकडे येत आहेत. त्यानुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आनेवाडी टोलनाका येथे सापळा लावला होता. सदरील वाहनाची तपासणी केली असता आर.एम.डी. पान मसाला व तंबाखू असा 8 लाख 16 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 13 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात दि. 13 मे ते दि. 15 जून या कालावधीमध्ये विशेष मोहिम (Special Drive) राबवून अंमली पदार्थ, महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा विक्रेते, वाहतूक यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची स्वतंत्र दोन पथके तयार करण्यात आलेली आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास बातमीदारांकडून वाहन क्रमांक (एम.एच.12 टी. व्ही. 9580) मधून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री व वाहतूकीकरता बंदी असलेला गुटखा पानमसाला घेवून पुणे येथून सातारा बाजूकडे येत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथकास नमुद वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने आनेवाडी टोलनाका (ता. जावली, जि.सातारा) येथे सापळा लावला. सदरील वाहनातील दोन इसमांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी वाहनामध्ये आर.एम.डी. गुटखा / पानमसाला असल्याचे सांगीतले. या कारवाईत 13 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार याच्या समक्ष मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत भुईंज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, वंदना रुपनवर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, राकेश खांडके, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, म.पो.ना.मोना निकम, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत केली.