kota acadamy karad
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

पाटण तालुक्यात बिबट्याने एकाचवेळी पाडला 5 शेळ्याचा फडशा

चाफळ। चाफळ विभागात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली आहे. भरदिवसाही पाळीव प्राण्यावर हल्ला चढवू लागला आहे. गुरुवारी रात्री चाफळ (ता. पाटण) येथील पत्रकार कृष्णत रघुनाथ साळुंखे यांच्या शेडमध्ये बांधलेल्या पाच शेळ्या ठार केल्याची घटना डाग नावाच्या शिवारात घडली आहे. यामध्ये साळुंखे यांचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या रोजच्याच हल्याने चाफळ परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पत्रकार कृष्णत साळुंखे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन केले आहे. चाफळ गावापासून जवळच असलेल्या डाग नावाच्या शिवारात त्यांनी शेळ्यांना शेड बांधले आहे. गुरुवारी रात्री त्यांचा मुलगा ऋषिकेश हा शेळ्यांना चारा टाकून घरी आला. रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेडच्या जाळ्या वाकवून आत मध्ये प्रवेश करत तीन गाभन शेळ्या, एक बोकड व एक बकरी ठार केली आहे. विभागात काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. चाफळ परिसरानंतर आता हा बिबट्या बोर्गेवाडी गावाकडे सरकला असल्याने व थेट भरदिवसाही हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे, असे असताना. मात्र, वनविभाग कोणतीच उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. बिबट्याने शेळी फस्त केल्यानंतर फक्त पंचनामे करण्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांचा जोर वाढल्याचे चित्र आहे.

चाफळ विभागातील अनेक गावांतील अनेक शेळ्यांवर यापूर्वी बिबट्याने अनेकदा हल्ले चढवून पशुधन धोक्यात आणले आहे. बिबट्या अचानक शेळ्यांच्या कळपावर व जनावरांच्या शेडमध्ये घुसुन हल्ला चढवू लागला आहे. मंगळवारी कोळेकरवाडी (ता. पाटण) येथील टोंग नावाच्या शिवारात येथील किसन कोळेकर यांच्या शेळ्या चरण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. येथेच झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. गूराख्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. चाफळ, माथणेवाडी जाळगेवाडी येथून पाळीव कुत्र्यांची शिकारही बिबट्याकडून रोजच होत आहे. वनविभागाचे कर्मचारी एम. पी. साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आसून पायाच्या ठशावरुन हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close