क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारा

Satara News : लग्नाला अडथळा ठरणाऱ्या नवविवाहितेच्या पतीचा प्रियकराने केला खून

फलटण | तीन महिन्यापूर्वी लग्न केलेल्या प्रियसीच्या पतीचा प्रियकराने काटा काढला. पुण्यातील  एका तरूणीचा साताऱ्यातील फलटण येथील अजित पोपट बुरूंगले (वय- 24, रा. नगरपरीषद शाळा क्रमांक 7 पाठीमागे, शिवाजीनगर, फलटण) यांचा विवाह झाला होता. तर तरूणीचे पुण्यातील करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबधातून फलटण येथील युवकाच्या खून प्रकरणात प्रियसी व प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, प्रियकराने प्रियसीसोबत लग्न करण्यासाठी साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून केला असून हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालव्यात मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी (दि.17) रात्रीच्या सुमारास अजित बुरूंगले हा घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मंगळवारी (दि- 19) विडणी गावच्या हद्दीत निरा उजवा कालव्यामध्ये एक मृतदेह सापडला. सदरील मृतदेहावरील कपडे व वर्णन यांच्यावरून तो अजित बुरूंगले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अजित याच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिचे लग्नापूर्वी करण भोसले याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. प्रेमसंबधास पतीचा अडथळा येत असल्याने करण भोसले याने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले याच्या मदतीने खुनाचा कट रचला.

रविवारी (दि.१७) रात्री त्याने अजित बुरुंगले याला फोन करून घराबाहेर बोलावून संशयित आरोपी करण आणि त्याच्या साथीदाराने दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर हात- पाय बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने मृतदेह निरा उजवा कालव्यामध्ये टाकला. याबाबतची कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले याने दिली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या खून प्रकरणी अजितची पत्नी आणि करण भोसले यास अटक केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker