JOB : कराडमध्ये थेट मुलखातीद्वारे नोकरीची संधी, भरती सुरू

कराड । कराड शहर किंवा नजीकच्या गावात राहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कराड येथिल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या पटेल मार्केटिंग (आहुजा) इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये कामगारांची भरती सुरु आहे. सेल्स पर्सन या पदासाठी ही भरती होणार असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 -7 -23 रोजी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
सदर नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण किमान 12 वी पर्यंत तरी असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे 3 वर्षाचा अनुभव असावा. मुख्य म्हणजे केवळ इलेक्ट्रॉनिक आणि गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीतील अनुभवी व्यक्तीच यासाठी संपर्क करू शकतात. पात्र उमेदवाराला 10 हजार रुपये पगार देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर जाऊन मुलाखत द्यावी.
फर्म- पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा)
पदाचे नाव – सेल्स पर्सन, computer operator, tally GST accountant.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी + 3 वर्षांचा अनुभव
पगार – 10 हजार रुपये
मुलाखत दिनांक – 20- 7- 2023 (सकाळी 11 वाजता )
मुलाखतीचा पत्ता – पटेल अहुजा, शनिवार पेठ, कराड ( मोबाईल नंबर – ९१५८७५७७७७) 9158757777