वसंतगडच्या स्वरांजली कोकरेची नवोदय विद्यालयासाठी निवड
कराड | वसंतगड (ता. कराड) येथील वि. ग. माने विद्यालयातील कु. स्वरांजली अनिल कोकरे हिची सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल तिचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
श्री बिरुदेव क्लासेसचे स्वरांजलीला नवोदय विद्यालयच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन लाभले. तिचे कराड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलवडे, शिक्षक राजेश मोरे व शिक्षिका लतिका मोरे, सरपंच अमित नलवडे, विवेक ढवळे, वैशाली फल्ले, रविराज चिंचकर, धनाजी येडगे, प्रविण चिंचकर, सुहास गायकवाड यांनी अभिनंदन केले.
यावेळी राजेश मोरे म्हणाले, नवोदय विद्यालयासाठी निवड होणे अभिमानास्पद बाब आहे. पाचवीनंतर या परिक्षेसाठी तयारी करून एक चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने या परिक्षेला सामोरे जावे. स्वरांजलीला मिळालेले यश हे प्रेरणादायी आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी या नवोदय परिक्षेमुळे होत आहे.