Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

Karad : टेम्पोच्या धडकेत महिला ठार तर भाची गंभीर जखमी

कराड | मलकापूर (ता. कराड) टेंपोने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाली, तर तिची भाची गंभीर जखमी झाली. गुलशन निजाम मुल्ला (वय- 50, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कार्वेनाका कराड, मूळ रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सिमरन राजू पटेल या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वेनाका येथील त्रिमूर्ती कॉलनीमध्ये राहणाऱ्या गुलशन मुल्ला व सिमरन पटेल या दोघी मुलगा समीर यांच्यासमवेत दुचाकीवरून कामेरीला निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास ते महामार्गाच्या उपमार्गावर मलकापूर गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर आले असताना पाठीमागून आलेल्या टेंपोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. टेंपोच्या धडकेनंतर गुलशन मुल्ला या टेंपोच्या चाकाखाली सापडल्या, तर समीर शेरकर आणि सिमरन हे दोघे जण बाजूला पडले.

अपघातानंतर चालकाने टेंपो जागेवरच सोडून तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन तिघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी गुलशन मुल्ला यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर सिमरन पटेल यांच्यावर उपचार सुरू आहेत. समीर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातप्रकरणी टेंपोच्या चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close