शिंदे- फडणवीस पत्रकार परिषद : कोर्टाच्या निर्णयानंतर मांडले 6 महत्वाचे मुद्दे

मुंबई | सरकार सेट झालं. सर्वाेच्च न्यायालयाने पूर्णपणे घटनात्मक ठरवलेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत मी स्वागत करतो. न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, या निकालाबद्दल आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीमध्ये आज लोकमताचा आज पूर्णपणे विजय झालेला अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे ः-
1) महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. उध्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही.
2) अपात्रतेचा निर्णय हा संपूर्ण अधिकार हा अध्यक्षाचा आहे. सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अध्यक्षांचे अधिकार अध्यक्षांना दिले.
4) अपात्रतेचा निर्णय ज्या 16 आमदारांचा आहे, त्यांना पूर्णपणे अधिकार दिला आहे.
5) निवडणूक आयोग स्वतंत्र निर्णय घेवू शकते.
6) एकनाथ शिंदे यांचे सरकार राहणार
उध्दव ठाकरेंची पत्रकार परिषद मी पाहत नाही, परंतु आज पाहिली : फडणवीस
उध्दव ठाकरें पत्रकार परिषदेत म्हणाले, नैतिकतेच्या अधिकारावर राजीनामा दिला. तेव्हा मी विचारतो, भाजपा सोबत निवडूण आलात आणि तुम्ही काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत गेला तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये. तुम्ही खुर्ची करता विचार सोडला, तर एकनाथ शिंदेनी विचारा करता खुर्ची सोडली. उध्दव ठाकरे यांच्या लक्षात आले होते की, लोक तुम्हाला सोडून गेल्याने, भीतीपोटी उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवू नका. एकनाथ शिंदेंनी राजीनामा देण्याचा विषय नाही, कारण आज त्याच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब सर्वाेच्च न्यायालयाने केला आहे.