शिवपुत्र संभाजी महानाट्य : कराड येथे भव्य रंगमंचाचे भूमिपूजन

कराड | कृष्णाई क्रिएटिव्हज कराड या समूहाच्या वतीने आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या भव्य रंगमंच भूमिपूजनाचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. भाजप प्रदेश सचिव व हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक शिवाजीराव पवार यांच्या हस्ते व कृष्णाईचे वासू पाटील, दीपक शिंदे, प्रसाद देशपांडे, विनायक कवडे आणि तमाम शंभूप्रेमी शिवप्रेमी उपस्थितीत संपन्न झाला.
कृष्णाई क्रिएटिव्हज या समूहाच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकारांच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजांचा पराक्रम आणि ख्याती सांगणारे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य यशवंत नगरी कराडमध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे 28 एप्रिल ते 3 मे अखेर सादर होत आहे.
यावेळी विक्रम पावसकर म्हणाले, देशाच्या भावी पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी यासारख्या महानाट्याची गरज आहे कराड आणि आसपास पंचक्रोशीतील लोकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा तसेच या महानाट्यासाठी माझे व तमाम हिंदू लोकांचे सहकार्य राहील असे सांगितले