श्री नाईकबा सहकारी पाणी पुरवठ्याची निवडणूक बिनविरोध : चेअरमनपदी विजयकुमार पाटील

कराड । सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत श्री नाईकबा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. बेलदरे, म्होप्रे, भोळेवाडी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या संस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार मोहनराव पाटील, व्हा. चेअरमनपदी विजय पंढरीनाथ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.
या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकपदी वसंत विठ्ठल माने, दिलीप ज्ञानू चव्हाण, नारायण बिरोबा शिंदे, संजय धोंडीराम काटकर, सर्जेराव बजरंग सुर्यवंशी, प्रदीप तुकाराम सुर्यवंशी, काशिनाथ यशवंत गोसावी, बाबालाला सरदार मुलाणी, श्रीमती रुपाली अनिल कदम, श्रीमती सुलोचना अधिकराव शिंदे, सचिव अनिल कदम यांनी ग्रामस्थांसमवेत कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ॲड. पृथ्वीराज पाटील, प्रताप सुर्यवंशी, हौसेराव सुर्यवंशी, बाबासो सुर्यवंशी, प्रकाश सुर्यवंशी, रविंद्र सूर्यवंशी, जितेंद्र सुर्यवंशी, मारुती सुर्यवंशी, आप्पासो सुर्यवंशी, शंकर सुर्यवंशी, शशिकांत काटकर, शरद पाटील, बबन पवार, रमेश काटकर, अजय कदम, आशिष शिंदे व सभासद शेतकरी उपस्थित होते.