कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

सह्याद्री कृषी विद्यालयाची आरती कारंडे हिची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

कराड । यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आरती तानाजी कारंडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन- 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट- ब सेवा संयुक्त परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

आरती सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंतनगर येथून बी. टेक (ऍग्रीकल्चरल इंजिनिअरींग) पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती पदवीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. तिच्या या यशाबद्दल सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, महाविद्यालय समितीचे अध्यक्ष जशराज पाटील व सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील राठोड, कारखान्याचे सर्व अधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी आरती हिचे अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close