PM किसान व नमो किसान योजना : कृषि विभागाची मंगळवार व बुधवारी गावा-गावात विशेष मोहिम
कराड तालुक्यातील 70 गावात आधार लिंक व केवायसी प्रक्रिया राबविणार

कराड | कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी दिनांक 20 व 21 रोजी कराड (Karad) तालुक्यात कृषी विभागाकडून (Agriculture Department) विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी केवायसी व आधार लिंक (Aadhaar link and KYC) प्रक्रिया करता यावी, यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मंगळवार व बुधवार दोन दिवस गावागावात जाऊन राबविण्यात येणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी केले आहे.
मंगळवार (दि. 20) रोजी सुपणे, अंबवडे, तळबीड, गोळेश्वर, कोळे, तांबवे, वहागांव, वस्ती साकुर्डी, तारूख, राजमाची, गोंदी, सयापुर, वाघेरी, कार्वे, शिरवडे, करवडी शामगाव, दुशेरे, वडोली निळेश्वर, वडगाव हवेली, शेरे, खोडजाईवाडी, वराडे, वडगांव, उंब्रज, नवीन कवठे, चिखली, चरेगांव, मुनावळे, पाटील मळा, अोंडोशी, मनव, गोटेवाडी- भरेवाडी, उंडाळे, वाठार, आटके, काले या ठिकाणी आधार लिंक व केवायसी पूर्ण करण्याचे कामकाज कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे.
दिनांक 21 रोजी बुधवारी गोटे, भोळेवाडी, गमेवाडी, विंग, आणे, साजूर, वनवासनाची (खोडशी), वसंतगड, येणके, वनवासमाची (सदाशिवगड), मेरवेवाडी कामथी, सैदापूर, रेठरे बुद्रुक, गोवारे, कोपार्डे हवेली, सुर्ली, पार्ले, नडशी, थोरात मळा (शेणोली स्टेशन), शेणोली, यादववाडी, हेळगांव, पाडळी- हेळगांव, कालगाव, मसूर, खालकरवाडी, बांधेकरवाडी, संजयनगर, माटेकरवाडी, नारायणवाडी, गणेशवाडी, साळशिरंबे, तुळसण, रेठरे खुर्द, धोंडेवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी व गावात सेवा देण्यात येणार आहे. मंगळवार व बुधवारी 30 जणांची टीम सकाळी 7 ते 6. 30 यावेळेत ईकेवायसी, आधार लिंक करण्याचे काम करण्यात येणार आहे.