कोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराज्यविदर्भशैक्षणिक

SSC निकाल घटला : मुलीच भारी, कोकणची आघाडी तर नागपूरची पिछाडी

मुंबई| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये कोकण विभागाचा 98.11% निकाल लागला असून सर्वात आघाडी घेतली आहे. तर नागपूर विभागाचा 92.5% हा सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदाच्याही निकालात मुलांच्या पेक्षा मुलींनी 3.82% ने बाजी मारली. तर एकूण निकाल -93.83 टक्के लागला. कोल्हापूर विभाग -96.33 टक्के, पुणे -95.64 टक्के निकाल लागला आहे.

यंदा दहावी साठी एकूण 8 हजार 312 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 7 हजार 688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.49 टक्के इतका निकाल दिव्यांग विद्यार्थ्यांचा लागला. राज्यात दहावीसाठी एकूण 67 विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये 25 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला. राज्यातील एकूण 23 हजार 13 शाळांपैकी 6 हजार 844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. एकूण 15 लाख 79 हजार 371 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तर 5 लाख 26 हजार 210 प्रथम श्रेणी, तीन लाख 34 हजार 15 द्वितीय श्रेणी, व 85 हजार 298 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

दहावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.87% तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.5 टक्के इतकी आहे. यंदा दहावीचा निकाल 3.11 टक्क्यांनी घसरला असून 2020 व 2023 ची परीक्षा पद्धती एक असतानाही या दोन्ही मधील निकालामध्ये 1.24 टक्क्यांनी निकाल घसरल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. सन 2020 साली 95.30 टक्के, सन -2021 साली 99.95% सन-2022 96.92% आणि सन -2023 आले 93.83% निकाल दहावीचा लागला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker