सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत यश
कराड | यशवंतनगर (ता. कराड) महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषि संशोधन परिषद, पुणे मार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सामायिक पदव्युत्तर प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या प्रवेश परीक्षेच्या निकालामध्ये सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंतनगर, कराडच्या 15 विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्यात मृणाल सावंत (रँक-5), प्राजक्ता पानस्कर (रँक- 17), पल्लवी पिसाळ (रँक- 20), मयुरी पाटील (रँक-24), प्राजक्ता जाधव (रँक-25), तेजश्री बांडे (रँक-26), सुमेध बागुल (रँक-26), ओंकार कदम (रँक-26), ऐश्वर्या जगदाळे (रँक-30), वैष्णवी कत्ते (रँक-33), श्रद्धा जगदाळे (रँक-33), महेश कारंडे (रँक-34), प्रमोद पाटील (रँक-42), अश्विनी खबाले (रँक-42), गायत्री पाखले (रँक-44) यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील राठोड आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माजी सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी गायकवाड, महाविद्यालय समितीचे अध्यक्ष जशराज पाटील व सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कारखान्याचे सर्व अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील राठोड, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.