मसूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुजाता पाटील : क्लबचा सायकल बँक उपक्रम
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूर लायन्स क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सुजाता पाटील विराजमान झाल्या. सचिवपदी मनीषा निकम, सहसचिवपदी प्राजक्ता दीक्षित, खजिनदारपदी विद्या जाधव यांनी पदभार स्वीकारला. समाजासाठी विविध उपक्रम राबवत असलेल्या लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला.
रिजन चेअरमन राजेंद्र शहा कांसवा, रिजन चेअरमन बाळासाहेब शिरकांडे, कराड मर्चंटचे चेअरमन व सह्याद्री कारखानाचे संचालक माणिकराव पाटील, प्रांतपाल जगदीश पुरोहित, झोन चेअरमन प्रशांत व्हावळ, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक मानसिंगराव जगदाळे, महानंदा डेअरीचे संचालक वसंतराव जगदाळे प्रमुख उपस्थित होते. माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मसूर ग्रा.पं.सदस्य व लायन्स क्लब सदस्य रमेश जाधव यांच्यावतीने गरजू विद्यार्थिनींना पाच सायकल देवून लायन्स क्लबच्या सहकार्याने सायकल बँक हा कायमस्वरूपी उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात सुरेश पाटील, जितेंद्र निकम, शिवराज फाटक यांनी नवीन सायकल देण्याचे जाहीर केले.
मावळते अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गतवर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्षा सुजाता पाटील यांनी क्लबच्या माध्यमातून समाजपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. प्राचार्य विक्रम शिंदे, दीनानाथ मेटकरी, रतन फडतरे यांनी लायन्स क्लबचे नवीन सदस्यत्व स्विकारले. कार्यक्रमास लायन्स क्लबचे कराड व मसूरचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. रमेश लोखंडे, सनी रामुगडे यांनी करून दिला. रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र निकम, राम धरणे यांनी स्वागत केले. सदाशिव रामुगडे यांनी आभार मानले.