Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रशैक्षणिकसातारासामाजिक

लायन्स क्लब कराड सिटी तर्फे 150 विद्यार्थ्यांचे आय चेकअप

विशाल वामनराव पाटील
कराड लायन्स कडून प्रांताचे माजी प्रांतपाल PMJF लायन सुनिलजी सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आय चेकअप शिबीर (sight first) हा उपक्रम नगरपालिकेच्या शाळा नंबर 12 इथे हा उपक्रम घेण्यात आला. या शिबिरामध्ये 150 विद्यार्थ्यांचे डोळे चेकअप करण्यात आले.त्यापैकी 10 ते 15 विद्यार्थ्यांना चष्मा नंबर लागल्याचे निदर्शनास आले असून त्यांना चष्मे डॉ. चोपडे देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या शिबिरास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील डॉ. चोपडे, डॉ. महेश शिंदे व अरुण काळे तसेच आबासो कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन संदीप कोलते, सचिव लायन मंजिरी खुस्पे, खजिनदार लायन मीना कोलते, ला शंभूराज यादव, ला दिग्विजय पाटील, ला शशिकांत पाटील, ला झोन चेअरमन सुशांत व्हाव्हळ, ला उमा जानुगडे, ला डॉ. शर्मिष्ठा गरुड, ला नीलम यादव उपस्थित होते.

डाॅ. चोपडे म्हणाले, आजकाल इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर जीवनात वापर होवू लागला आहे. यामध्ये मोबाईल, टीव्ही पाहणे आणि गेम्स खेळण्यामुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असतो. अशावेळी त्यांना या गोष्टीची परिपूर्ण कल्पना नसते, तेव्हा लायन्स क्लब कराड सिटीने घेतलेले शिबिर समाजातील पुढच्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. डोळ्याला चष्मा लागणे चुकीचे असे नाही, मात्र त्यांची गरज असताना दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close