लोकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय : विक्रमबाबा कदम
पुसेसावळी येथे विकास कामांचे भूमिपूजन

पुसेसावळी। सातारा जिल्हा नियोजन मंडळ सदस्या सुनीता कदम यांच्या माध्यमातून पुसेसावळी गावाच्या विकासकामांना प्राधान्य देऊ. पुसेसावळी परिसरातील नागरिकांनी आम्हा कदम कुटुंबियांवर नेहमीच प्रेम केले. त्या लोकांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम यांनी केले.
पुसेसावळी (ता. खटाव) येथे माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सातारा जिल्हा नियोजन मंडळ सदस्या सुनिता धैर्यशील कदम यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पुसेसावळी मधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, रवींद्र कदम, महेश पाटील, बबलू पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य कांता गोसावी, ज्ञानेश्वर पवार, भानुदास कुंभार, दादासो कदम, श्रीराम रत्नपारखी, जयवंत पिसे, विकी पाटील, अमर पाटील, शुभम कदम, शिवसेना तालुका अध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) विशाल कुंभार, जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी पावशे, संजय कदम तात्या, जयवंत पिसे, नारायण कदम, नजीर इनामदार, आण्णा कांबळे, निखिल माने (कॉन्ट्रॅक्टर), नामदेव फडतरे, शिवाजी पवार, राहुल कदम, शुभम पाटील, संभाजी कदम, जगदीश त्रिंबके, सौरभ कदम, क्षितिज कदम युवा उद्योजक, ज्ञानेश्वर लवळे, पप्पू कारंडे, शिवाजी पवार कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वात विकासकामे सुरू : विक्रमबाबा कदम
आपले नेते धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामात कोणतेही राजकारण न आणता. ज्यांच्या ताकदीवर स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हा कदम कुटुंबियांना या पुसेसावाळीच्या जनतेने कायम निवडून दिले. अशा लोकांसाठी आम्ही काय करू शकतो, याचा विचार करूनच शेतीच्या पाण्यासाठी उरमोडी योजनेच्या पाण्याचा आवर्तनाचा प्रश्न सोडविला. पुसेसावळी परिसराला पाणी आले, त्यामुळे आता परिवर्तन दिसून येत आहे.आता पाणी आले तरी मात्र प्रश्न अजून संपलेला नाही. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सबस्टेशन वाढविणे गरजेचे आहे. या परिसरातील नागरिकांसाठी अद्यावत 100 बेडचे रुग्णालय सुरु करण्यात येईल, असेही विक्रमबाबा कदम यांनी सांगितले.