पाटण बाजार समिती : सभापतीपदी बाळकृष्ण पाटील, उपसभापतीपदी विलास गोडांबे बिनविरोध

पाटण | पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण रामचंद्र पाटील (आडूळ गावठाण), उपसभापती विलास हरी गोडांबे (घोटील) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला तब्बल 40 वर्षांनी देसाई सभापती, उपसभापती पदासह सत्ता मिळाली. यामध्ये पहिला मान आडूळ आणि घोटील गावाला देण्यात आला. सभापती व उपसभापती यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.
मल्हारपेठ (ता. पाटण) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात या निवडी आज पार पडल्या. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर, पंजाबराव देसाई, शिवशाही संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांच्यासह देसाई गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड, गिताजंली कुंभार, सचिव हरिभाऊ सुर्यवंशी यांनी प्रक्रिया पार पाडली.
पाटण बाजार समितीची स्थापना 1968 सालची असून पहिल्यांदाच देसाई गटाला सत्तेची संधी मिळाली. यामध्ये पाटणकर गटातून 3 जागा बिनविरोध झालेल्या होत्या. तर सोसायटी व ग्रामपंचायतमधून 15 जागांवर मंत्री शंभूराज देसाई गटाने विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले.