साताऱ्याच्या प्रतिक्षाची UPSC स्वप्नपूर्ती : ना क्लास, ना अकॅडमी, दोनदा अपयश, 0.79 मार्कांनी हुलकावणी

सातारा | आयएएस होणं आणि आयपीएस होणं हे अनेक मुलांच स्वप्न असतं हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अनेक मुलं पुणे तसेच दिल्लीची वाट धरतात. मात्र सातारा सारख्या ग्रामीण भागात राहून प्रतिक्षा संजय कदम हीनं हे स्वप्न सत्यात उतरवल. प्रतिक्षानं ना क्लास, ना अकॅडमी लावली तरी UPSC मध्ये साता-याचा झेंडा फकडकवत 560 वा क्रमांक मिळवला आहे. प्रतीक्षा ही शेतकरी कुटुंबातील असून तिने स्वतःच जिद्दीने हे यश मिळवले आहे. तिने मिळवलेल्या या यशाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पहायला मिळत आहे.
सुरवातीला 2019 साली UPSCची परिक्षा प्रतिक्षान दिली होती. मात्र, यात तिला अपेक्षीत यश मिळालं नाही, 2020 ला झालेल्या परिक्षेत अवघ्या 0. 79 मार्कांनी हुलकावणी दिल्यानंतर प्रतिक्षानं झालेल्या चुका सुधारत अविरत अभ्यास केला आणि शेवटी या परिक्षेत यश संपादन केलं. कोणताही क्लास न करता हा आभ्यास प्रतिक्षा कदम हिनं केला. यामुळं तिच्या या यशाला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. साता-यातील वळसे या छोट्या गावातील प्रतिक्षानं UPSC चा घरीच अभ्यास करत मिळवलेलं यश हे महाराष्ट्रातील इतर मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे. प्रतिक्षा कदम हीने या यशाचं श्रेय आई- वडील आणि भावाला दिलं असून त्यांनी मला वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन हे महत्वाचं होतं. तिच्या काकांनी तसंच गावातील अनेकांनी पुस्तकांच्या स्वरुपात केलेली मदत आणि स्वत: चे अविरत प्रामाणीक प्रयत्न UPSC पास होण्यासाठी महत्वाचे महत्वाचे ठरले, असं मत प्रतिक्षा कदम हिनं व्यक्त केले.
प्रतीक्षाने लोणेरे, (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये ई अॅण्ड टीसीमधून बीटेक पदवी घेतली आहे. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आल्यावर न खचता तिने अभ्यासात चिकाटी कायम ठेवली. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे यश तिला मिळाले. सध्या आयपीएसपर्यंत पोहचली असली तरी भविष्यात आयएएससाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने सांगितले.