कालगावच्या समर्थ हायस्कूलचा SSCचा 100 टक्के निकाल

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कालगांव (ता. कराड) येथील श्री समर्थ हायस्कूलचा एस.एस.सी..परीक्षा मार्च 2023 चा निकाल 100 टक्के लागला. विद्यालयातील ऋतुजा हणमंत चव्हाण हीने 95.60 टक्के गुण मिळवून विद्यालयात व खराडे केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
जयदीप संदिप चव्हाण याने 85.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. कु.संचिता संपत चव्हाण हीने 79.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. कु.मानसी बापूसो चव्हाण हीने 76.60 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक, सुजित कैलास पवळे याने 76.20 टक्के गुण मिळवून पांचवा क्रमांक मिळवला.
मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार, ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण व सर्व पदाधिकारी, विकास सोसायटीचे चेअरमन आनंदराव चव्हाण व सर्व पदाधिकारी, श्री पंचगंगा शिक्षण प्रसारक मंडळ प्रयाग चिखलीचे अध्यक्ष राजदीप पाटील, उपाध्यक्ष दिप्ती पाटील, सचिव मंगल पाटीलव सर्व संचालक, कालगांवचे विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचेअभिनंदन केले.