साताऱ्यात चाकूने भोकसणाऱ्या आरोपीला अटक

सातारा | शहरात (दि. 5 जून) सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरुन जात असताना जुनी उधारी मागीतल्याचे कारणावरुन चिडून जावून तीन आरोपींनी एकावर पाठीमागे येवून डाव्या बाजुचे खुब्यात चाकूने ‘भोकसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करुन त्यांना गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. दि. 16/06/2023 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नमुद गुन्हयातील 1 पाहिजे असलेला आरोपी हा वाढे फाटा परिसरात वावरत आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने वाढे फाटा परिसरात सापळा लावून आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी साई ढाब्याचे समोर उभा असल्याचे आढळून आले. त्या संशयितास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे सुचनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, अमोल माने, दिपाली यादव, शिवाजी भिसे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, मोहसीन मोमीन यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई केली.