अन्यथा येणारी विधानसभा निवडणूक लढणार नाही : आ. जयकुमार गोरेंचा निर्धार

सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
माण- खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचंय. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून 95 गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील 16 गावांचे जिहे कठापूरमधून काम सुरू आहे. कुकुडवाडसह 44 गावांसाठी लवकरच सुप्रमा घेऊन त्याही गावांचा पाणी प्रश्न सोडवतोय. या 21 गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्धार आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
बिजवडी येथे उत्तर माणमधील 21 गावांना जिहे कठापूरचे पाणी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा घेण्यात आला होता, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयकुमार गोरे यांच्यावरती जेसीबीने फुलांची उधळण करत सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ जगदाळे, उद्योजक संजय गांधी, दहिवडी नगरसेवक अतुल जाधव, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष किसनशेठ सस्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, राजाराम बापू बोराटे, सरपंच अरुण सावंत, विठ्ठल भोसले, भाजपा सरचिटणीस काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.