डाॅ. अतुल भोसले वाढदिवस : रेठऱ्याच्या बैलजोडीने शर्यतीत दुचाकी HF- Deluxe जिंकली

कराड | भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृष्णा केसरी 2023 या बैलगाडी शर्यतीमध्ये रेठरे बुद्रुक येथील आनंदराव मोहिते यांच्या बैल जोडीने पहिल्या क्रमांकाचे एचएफ डीलक्स (HF- Deluxe) टू व्हीलर बक्षीस पटकावले. साळंशिरंबे- म्हारूगडेवाडी येथे येळगाव जिल्हा परिषद गट व उंडाळे विभागाकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीचे बक्षीस वितरण डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, दत्तात्रय देसाई, सयाजी यादव, बाजीराव निकम, पांडुरंग होनमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील, भाजपाचे कराड दक्षिण अध्यक्ष धनाजी पाटील, पंकज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
साळशिरंबे- म्हारूगडेवाडी येथे झालेल्या बैलगाडा शर्यती विजेते पुढील प्रमाणे ः- प्रथम क्रमांक- आनंदराव मोहिते (रेठरे बुद्रुक), द्वितीय क्रमांक – शंभो महादेव प्रसन्न (येरवळे), तृतीय क्रमांक- भैरवनाथ प्रसन्न, जावेद मुल्ला (तांबवे), चतुर्थ क्रमांक ः- जयवंत साळुंखे (काले), पाचवा क्रमांक- संतोष पाटील (आैताडे बुद्रुक), सहावा क्रमांक- आर्यन पाटील (जिंती). विजेत्यांना कृष्णा केसरी 2023 ढाल देऊन गौरवण्यात आले.