क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोयना पुलावर ॲपे रिक्षा व दुचाकीचा अपघात

कराड | पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोयना पुलावर ॲपे रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी हे पाटण तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोयना पुलावर ॲपे रिक्षा व दुचाकीचा अपघात बुधवारी दुपारी झाला. यामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दिनकर रामचंद्र सूर्यवंशी व भाऊ काशिनाथ सूर्यवंशी (रा. पाटण) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात दुचाकी व अपे रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, दस्तगीर आगा, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक दस्तगीर आगा, विजय पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close