क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

आगाशिवनगर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह विहीरीत आढळला

पाटण | आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथून गुरूवारी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ महिलेचा मृतदेह सकाळी त्यांच्या माहेरी गलमेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील सार्वजनिक विहिरीत आढळून आला. चंद्रकला शंकर माटेकर (वय- 65, सध्या रा. आगाशिवनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, माटेकर कुटुंबीयांचे मूळगाव चिचांबा- माटेकरवाडी, (कुंभारगाव, ता. पाटण) हे असून, अनेक वर्षांपासून ते आगाशिवनगरला स्थायिक आहेत. चंद्रकला माटेकर गुरूवारी घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय व नातेवाईक त्यांचा शोध घेत होते; परंतु आढळून आल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईंकानी कराड शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

गुरूवारी सायंकाळी चंद्रकला माटेकर यांना माहेरी गलमेवाडी येथे काही जणांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी तेथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ त्यांच्याकडे असलेली पिशवी व चप्पल आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. खात्री केल्यावर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. येथील पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कराड येथे पाठविण्यात आला. सायंकाळी कराड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही आत्महत्या की अपघात, याचा तपास सुरू आहे. येथील पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker