कराडमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा : राज्यासह परराज्यात तपास यंत्रणा राबवत डीबीची कारवाई
कराड ः- कराड शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत जुन्या कोयना पुलालगत दैत्य निवारणी मंदीरापासुन काही अंतरावर नदीपात्रात पुरुष जातीचा 30 ते 35 वयोगटातील 5 फुट 5 इंच उंचीचा मृतदेह संशयास्पद मिळुन आला होता. मृताची ओळख पटु नये याकरीता मृतास सिंमेटच्या पाईपने काळी दोरीच्या सहाय्याने बांधुन मृत देह नदीपात्रात बुडवीला होता. सदर मृत इसमाचा निघृण खून झाला असल्याचे समोर आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु केले. सुमारे 4 दिवस सिंमेटच्या पाईपला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात राहीलेने पुर्णतः सडलेला होता. त्यामुळे ओळख पटविणे आव्हानात्मक होते. मृतदेहाच्या अंगावरील कपडे हातावरील गोंदलेले नाव व चिन्ह या अनुषंगाने ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरु केली. सुरवातीला घटनास्थळापासुन काही अतंरावर असलेले नागरिकाच्याकडे चौकशी केली. मात्र, काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर राज्यासह परराज्यात तपास यंत्रणा राबवत कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला संशयित आरोपींना ताब्यात घेत खुनाचा उलगडा करण्यात यश आले आहे.
सदर खुनाच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी शकील अन्वर शेख (वय- 20, रा. दैत्यनिवारणी मंदीर कराड), कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय- 24, रा. मुजावर कॉलनी कराड ता. कराड) अशा दोन आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी अन्य एकाचे मदतीने खुन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संशयितांना आरोपींना दिनांक 07/03/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. कराड शहर, कराड तालुका, मुंबई, पुणे, चिपळून सह कर्नाटक राज्यात तपास यंत्रणा राबवली. गुन्ह्याचे तपासामध्ये तांत्रिक तपासावर जोर दिल्यानंतर अथक प्रयत्न करून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउनि पतंग पाटील, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांना आरोपीची माहिती मिळवण्यात यश आले.
सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, पो नि स्थागुशा अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उत्तम भापकर, सपोनि अमित बाबर, सपोनि राहूल वरोटे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोउनि चोरगे, पोउनि चव्हाण, पोउनि पवार, सफौ. रघुवीर देसाई, सफौ. संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, सुनिल माळी व स्थानिक गुन्हे शाखाचे सपोनि सुधीर पाटील, सपोनि रोहीत फारने, पोउनि अमित पाटील, पोहवा शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगदने, लैलेश फडतरे, मयुर देशमुख, अविनाश चव्हाण, मोहन पवार, शिवाजी गुरव, मोसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, अरुण पाटील, विशाल पवार, गणेश कापरे,, स्वप्निल कुंभार, वैभव सांवत यांनी केलेली आहे.