मंदिरात चोरी करणारे तीन अल्पवयीन चोरटे ताब्यात
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

कराड,-ः बैलबाजार रोड मलकापूर येथील गणेश मंदिरातून रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली धातूची गणपतीची मूर्ती चोरणाऱ्या अल्पवयीन तीन चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली गणपतीची मूर्ती असा एकूण 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर येथे बैलबाजार रोडवर गणेश मंदिर आहे. त्या मंदिरातून रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली मूर्तीची चोरी झाली होती. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी या चोरीचा छडा लावण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना दिल्या होत्या. भापकर व त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे माहिती घेऊन सैदापूर येथून तिन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांना चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली रोख रक्कम व चांदीचे आवरण असलेली गणेश मूर्ती असा एकूण 14 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या अल्पवयीन चोरट्यांनी अशा प्रकारच्या चोऱ्य केल्याचा संशय निर्माण होत असल्याने त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, पोलीस हवालदार विजय मुळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, आनंदा जाधव, धिरज कोरडे, अमोल देशमुख, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केली.